NCP Candidate For Vidhan Parishad : निष्ठावंतांना नाकारलं, ज्येष्ठांचाही पडला विसर; सिनेसृष्टीतील कनेक्शन फळाला, ‘या’ सेलिब्रिटीच्या एका फोन कॉलमुळे झिशानला लागली उमेदवारीची लॉटरी

गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांनी विधानपरिषद उमेदवारी अर्ज दाखल केला यावर बॉलिवूड सुपरस्टारचा देखील हस्तक्षेप असल्याचा दावा केला जात आहे. 

NCP Candidate For Vidhan Parishad : निष्ठावंतांना नाकारलं, ज्येष्ठांचाही पडला विसर; सिनेसृष्टीतील कनेक्शन फळाला, ‘या’ सेलिब्रिटीच्या एका फोन कॉलमुळे झिशानला लागली उमेदवारीची लॉटरी

सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाली, आणि झिशान सिद्धीकी निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष  सुनील तटकरे, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक या प्रमुख नेत्यांची उपस्थिती देखील होती.

परंतू झिशान सिद्धीकी यांना पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर पक्षातून मात्र नाराजीचे सूर उमटताना पाहायला मिळत आहेत. पक्षातील अनेक दिग्गज आणि निष्ठावान इच्छुक असतानाही, वांद्रे पूर्वचे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता या उमेदवारीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या उमेदवारीसाठी केवळ पक्षातील नेत्यांकडून पाठिंबा देण्यात आला नसून बॉलिवूड सुपरस्टारचा देखील हस्तक्षेप असल्याचा दावा केला जात आहे. 

हेही वाचा- Amol Mitkari: 'आज अजितदादा असते तर…'; विधान परिषदेची उमेदवारी हुकली, अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषद निवडणुकीसाठी झिशान सिद्धीकी यांना उमेदवारी मिळावी यासाठी बॉलिवूड मधील एका अभिनेत्याने मुंबईतील लोखंडवालामधून राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबत संपर्क साधला होता. या बड्या बॉलिवूड सुपरस्टारच्या हस्तक्षेपामुळे झिशान सिद्दीकी यांची उमेदवारी मिळाल्याची चर्चा आता राष्ट्रवादीच्या वर्तुळात रंगली आहे. आता या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची लाट परसली असून पक्षात अंतर्गत वादाला फाटे फुटू लागले आहेत.

पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी न दिल्याने ते नाराज असल्याच्या चर्चांवर मिटकरी यांनी संयमित भूमिका घेतली. “जर अजित पवार आज असते, तर त्यांनी किमान मला फोन करून ‘यावेळी नाही, पुढच्या वेळी संधी देऊ’ असे सांगितले असते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षात त्यांनी माझा निश्चित विचार केला असता, असेही त्यांनी नमूद केले. मिटकरी यांनी त्यांच्या प्रतिक्रियेत सूचक इशाराही दिला. “मी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जर त्याचेच हे फळ असेल, तर ‘सब्र का फल मीठा होता है’, आणि ते फळ  मी ते आनंदाने स्वीकारतो,” असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number