Sanjay Raut: ‘या दोन्ही पक्षाचे 25 ते 30 आमदार भाजपामध्ये जातील’; संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य, ‘वेट अँड वॉच’चा दिला इशारा

पक्षांतर्गत बदल आणि आमदारांच्या हालचालींवरून नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

Sanjay Raut: ‘या दोन्ही पक्षाचे 25 ते 30 आमदार भाजपामध्ये जातील’; संजय राऊत यांचे खळबळजनक वक्तव्य, ‘वेट अँड वॉच’चा दिला इशारा

मुंबई: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)मध्ये अंतर्गत हालचालींमुळे खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे पत्रांवर पदांचा उल्लेख नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे. ते म्हणाले की, “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दिवंगत अजित पवार यांचे निकटवर्तीय होते, मात्र नव्या रचनेत ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या जवळचे असतीलच असे नाही.”

राऊत पुढे म्हणाले, “कोणाला पद द्यायचे किंवा काढायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. इतर पक्षांनी त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र माझा ठाम दावा आहे की, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल.” त्यांनी यापुढे आणखी एक मोठा दावा करत म्हटले की, “शिवसेना शिंदे गटातील 25 ते 30 आमदारही भाजपमध्ये विलीन होतील. सध्या या आमदारांना ‘वेट अँड वॉच’ करण्यास सांगितले गेले आहे.”

या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Weather Update : रात्री जोरदार पावसाची हजेरी होणार…; राज्यातील 9 जिल्ह्यांना हवामान खात्याचा अंदाज

सर्वोच्च न्यायालयावरही सवाल

दरम्यान, शिवसेना पक्षासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालय यावरही अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केले. “सुनावणी पुढे ढकलली जात असेल, तर न्यायव्यवस्थेवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत

तसेच, राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातही भाष्य केले. “उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जावे, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र या विषयावर अंतिम भूमिका उद्धव ठाकरेच मांडतील,” असे ते म्हणाले.

एकूणच, राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, येत्या काळात या घडामोडींना कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा: Gold Silver Rate Today: सोने-चांदी स्वस्त झालं; सोन्याच्या दरात मोठी घसरण, तर चांदीचे दरही 11900 रुपयांनी घसरले

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number