जोशी-बेडेकर महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

ठाणे, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसी चे प्रशिक्षण देण्यात […]

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार

ठाणे, ३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महाविद्यालयातील एनसीसी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसी चे प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणदरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. पण विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना अमानुष शिक्षा करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.

ही शिक्षा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजली आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या पाण्यात डोकं आणि पायावर उभं करण्यात आलं आहे. सीनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. विद्यार्थी थोडासा हलला तरी हा सीनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण इतकी अमानुष आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे.

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर,बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त असे एनसीसी चे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना लष्करी आणि नौदलाचे प्रशिक्षण पूर्वीचे धडे देण्यात येतात. याच दरम्यान विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्याने खळबळ माजलीय. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याच जोशी बेडेकर कोलेच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी खडसावून सांगितलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number