NCB ची मोठी कारवाई! मुंबईत 1,745 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; अमित शाह यांची पोस्टद्वारे माहिती

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, 1 मे 2026 रोजी एक्स पोस्टद्वारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलोग्रॅम उच्च प्रतीचे कोकेन जप्त करून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली. यावेळी शाह म्हणाले की, “आम्ही अमली पदार्थांच्या टोळीला निर्दयपणे चिरडून टाकण्याचा निर्धार केला आहे.” We are resolved to ruthlessly crush the narcotics cartel. […]

NCB ची मोठी कारवाई! मुंबईत 1,745 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; अमित शाह यांची पोस्टद्वारे माहिती

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवार, 1 मे 2026 रोजी एक्स पोस्टद्वारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलोग्रॅम उच्च प्रतीचे कोकेन जप्त करून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश केल्याची माहिती दिली. यावेळी शाह म्हणाले की, “आम्ही अमली पदार्थांच्या टोळीला निर्दयपणे चिरडून टाकण्याचा निर्धार केला आहे.”

हेही वाचा : Gold Theft Crime : सोने चोरीचा धक्कादायक प्रकार उघड; गोल्ड लोनची 15 खाती पाहून पोलिसही चक्रावले, 2 किलो सोनं अन् 1 लाखांची रोकड जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत 1,745 कोटी रुपये किमतीचे 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त करून एका मोठ्या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ टोळीचा पर्दाफाश केला आहे. हे ‘तळापासून वरपर्यंत’ या दृष्टिकोनाचे एक पथदर्शी उदाहरण आहे. जिथे एजन्सीने एका लहान खेपचा माग काढून एका मोठ्या नेटवर्कला जाळ्यात पकडले. या अभूतपूर्व यशाबद्दल एनसीबी टीमचे अभिनंदन,” असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि अमली पदार्थांचा तस्कर सलीम डोला याला तुर्कस्तानमधून भारतात आणल्यानंतर काही दिवसांनी ही जप्ती करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number