नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे मुख्यमंत्री

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नायब सिंग सैनी यांची हरियाणा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली.

नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे मुख्यमंत्री

चंदिगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नायब सिंग सैनी यांची हरियाणा भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. ते १७ ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. 

हरियाणाच्या विधानसभेतील ९० पैकी ४८ जागांवर विजय मिळवत भाजपाने बहुमत मिळवले. सलग तिसऱ्यांदा भाजपाने हरियाणात सत्ता स्थापन केली. काँग्रेसने हरियाणात ३७ जागांवर विजय मिळवला. 

सैनी यांचा शपथविधी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पंचकुला येथील सेक्टर पाच मधील दसरा मैदानावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते आणि रालोआची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number