नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या हेतूने लपवून ठेवलेला नक्षल्यांचा साहित्यसाठा आणि स्फोटके गडचिरोली पोलिस दलाच्या हाती लागली आहेत. पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला. धानोरा तालुक्‍यातील पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सी-६० पथकाच्या जवानांनी पेंढरी परिसरातील जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. नक्षल साहित्य, भूसुरुंग स्फोटासाठी वापरण्यात […]

नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घातपात घडवून आणण्याच्या हेतूने लपवून ठेवलेला नक्षल्यांचा साहित्यसाठा आणि स्फोटके गडचिरोली पोलिस दलाच्या हाती लागली आहेत. पोलिसांच्या सतर्कतेने नक्षल्यांचा घातपाताचा कट फसला. धानोरा तालुक्‍यातील पेंढरी जंगल परिसरात नक्षल्यांनी साहित्य लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सी-६० पथकाच्या जवानांनी पेंढरी परिसरातील जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. नक्षल साहित्य, भूसुरुंग स्फोटासाठी वापरण्यात येणारे सामान आणि दैनंदिन वापराचे साहित्य हाती लागले. पोलिस दलाच्या वतीने जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. ‘टीसीओसी’ च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number