नवाब मलिक यांची प्रकृती खालावली

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. मात्र, दरम्यान नवाब मलिकांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे. नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना […]

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे. मात्र, दरम्यान नवाब मलिकांची प्रकृती खालावली असल्याची माहिती समोर आली आहे.

नवाब मलिक यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. त्यामुळे मलिकांवर झालेल्या कारवाईंमुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली असून मविआकडून मुंबईतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे, मलिकांनी राजीनामी देण्याची मागणी विरोधक करत आहे. मलिकांच्या राजीनाम्याचा मागणीसाठी भाजपचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number