नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाक प्रेम’

  करतापूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले असून भाजपने सिद्धू यांना घेरले आहे.   करतारपूर येथे पाकिस्तानी शिष्टमंडळाने नवज्योत सिद्धू यांचे स्वागत केले. यावेळी सिद्धू म्हणाले, ‘इमरान […]

नवज्योत सिंग सिद्धूचं ‘पाक प्रेम’

  करतापूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले असून भाजपने सिद्धू यांना घेरले आहे.

  करतारपूर येथे पाकिस्तानी शिष्टमंडळाने नवज्योत सिद्धू यांचे स्वागत केले. यावेळी सिद्धू म्हणाले, ‘इमरान खान माझा मोठा भाऊ आहे. त्याने मला खूप प्रेम दिले आहे.’ सिद्धू यांच्या या वक्तव्यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

 सिद्धू यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धूंवर निशाणा साधला आहे. संबित पात्रा म्हणाले, ‘आज सिद्धूंनी इमारान खान यांना मोठा भाऊ संबोधून त्यांच्यावर खूप प्रेम करतो असे म्हणाले. सिद्धू यांच्या या वक्तव्यामुळे भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. सलमान खरशीद, मणिशंकर अय्यर, रशीद अल्वी आणि राहुल गांधी हे हिंदू आणि हिंदुत्वाला शिव्या देतात. तसेच दुसरीकडे सिद्धू पाकिस्तानच्या हिताची विधाने करत आहेत. हा योगायोग नाही.’ असे संबित पात्रा म्हणाले.

  काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना बडा भाई म्हणाल्याने नवा वादंग निर्माण झाला आहे. सिद्धूच्या वक्तव्याचा व्हिडिओ भाजपाच्या राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यावर आता नवज्योत सिंद्धू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, ‘भाजपाला जे हवे ते बोलू द्या, त्यांना जे आरोप करायचे ते करू द्या, त्यातून मला काही फरक पडणार नाही’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number