आमरस पिणाऱ्यांनो सावधान ! सडक्या आंब्यांपासून आमरस बनत असल्याचं उघड

बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीने धाड टाकण्यात आली

आमरस पिणाऱ्यांनो सावधान ! सडक्या आंब्यांपासून आमरस बनत असल्याचं उघड

नवी मुंबई: उन्हाळ्यात आमरस म्हंटल की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतेच मात्र बाजारात विकत मिळणारा हाच आमरस किती गलिच्छ जागेवर बनवला जातो, किती घाणेरड्या आंब्यापासून बनवला जातो हे पाहून नक्कीच आपण आमरस खातोय की आजारपणाला आमंत्रण देतोय हा प्रश्न आपल्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. अशातच एक किळसवाणी घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील बोनकोडे गावात आमरस बनविणाऱ्या एका कारखान्यावर मनसेच्या वतीने धाड टाकण्यात आली यावेळी धक्कादायक दृश्य निदर्शनास आली.

 बोनकोडे गावातील एका चाळी मध्ये अतिशय गलिच्छ जागेवर सडलेल्या आंब्यांच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या याच सडक्या आंब्यांपासून याठिकाणी आमरस बनविण्यात येत होतं. या आमरस चे श्रीजी या नावाने ब्रॅण्डिंग करुन हे घाणेरडे आमरस नवी मुंबईतील शहरात सर्वत्र विक्री करण्यात येत होते. रोज साधारण 6 हजार लिटर आमरस बनवून त्याची विक्री याठिकाणावरून करण्यात येत होती. आमरस बनविणाऱ्या कामगारांकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स मात्र तरीही बिनधास्तपणे आमरस बनविण्याचा कारखाना चाळविण्यात येत होता.

 यासंदर्भात मनपा प्रशासनाला कळविले असता कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येतेय. हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून या कारखान्यावर तात्काळ कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आलेय. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number