रशियाविरोधात नाटोचा इशारा

रशिया-युक्रेन येथे युद्ध सुरू झाल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आता जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रशियाच्या सैन्याने नाटो भागात हल्ला केला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील, असा इशारा नाटोने रशियाला दिला आहे. यूक्रेनच्या पूर्वेला नाटोचे सदस्य देश आहेत. […]

रशियाविरोधात नाटोचा इशारा

रशिया-युक्रेन येथे युद्ध सुरू झाल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धामुळे अनेक राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला चढवल्यानंतर आता जगावर अणु युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, रशियाच्या सैन्याने नाटो भागात हल्ला केला तर नाटोचे सदस्य रशियाविरोधात युद्ध पुकारतील, असा इशारा नाटोने रशियाला दिला आहे.

यूक्रेनच्या पूर्वेला नाटोचे सदस्य देश आहेत. नाटोने सांगितले की, रशियाच्या सैन्याने नाटो भागात हल्ला केला तर नाटो रशियाविरोधात युद्ध पुकारेल. तसेच नाटोने रशियाला युद्ध थांबवा असे सांगत कडक निर्बंधासाठी तयार रहा, असा इशारा दिला आहे. त्यामुळे रशियाने नाटोवर हल्ला केला तर भयंकर परिस्थिती उद्भवू शकते.

रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. तर दुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युक्रेनला पाठिंबा असल्याचे जाहीर झाले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत अनेक देशांनी रशियाने पुकारलेल्या युद्धाविरोधात आवाज उठवला आहे. तर अनेक युरोपीय देश पुढे सरसावले आहेत. मात्र, रशिया हल्ल्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number