मागील अनेक दिवसांपासून रशिया-युक्रेन देशामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाची युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला, गोळीबर करत आहे. रशिया युक्रेनच्या नागरी वस्तींना लक्ष्य करत हल्ले करत आहे. त्यामुळे या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता, युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की यांनी नाटोला युक्रेनला सामील करून घेणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
युक्रेनचे अध्यक्ष जेलेन्स्की म्हणाले, ‘नाटोने उघडपणे सांगितले पाहिजे की ते आम्हाला स्वीकारणार आहेत की नाही. नाटो रशियाला घाबरत आहे, आणि हे खरं आहे’, असे ते म्हणाले.
रशियाची युक्रेनवर तीव्र लढाई सुरूच असून रशियाने युक्रेनमधील सुमी शहराबाहेरील एका रासायनिक प्रकल्पावर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यामुळे प्रकल्पाच्या टाकीमध्ये ठेवलेला ५० टन अमोनिया गॅस बाहेर पडला असून हा गॅस नियंत्रणात आणण्यासाठी अधिक वेळ लागला.