PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं ‘हमीपत्र’, मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री ‘टॅब’

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात एकाच मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला.

PMC Election 2026 : पुणेकरांसाठी अजितदादांचं ‘हमीपत्र’, मेट्रोसह बसप्रवास मोफत; विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह फ्री ‘टॅब’

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात एकाच मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला. पुणे शहरासाठीचा जाहीरनामा राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकाशित करण्यात आला. यावेळी खासदार अमोल कोल्हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि सुप्रिया सुळे निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात एकत्र एका मंचावर आले. “पुण्यासाठी हमीपत्र” नावाने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो “अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची” अशा आशयाचा मजकूर लिहीत दिसून येत आहे. 

हेही वाचा : Pune Election 2026 : पुण्यातील NCP च्या जाहीरनामा प्रकाशनावेळी अजित पवारांचा महेश लांडगेंना मिश्लिक टोला; म्हणाले, ‘तो मोठा नेता…’

यावेळी अजित पवार म्हणाले की, 

आम्ही हे सगळ पुढच्या पाच वर्षात करून दाखवू. हा जाहीरनामा केवळ कागदावर नसेल. पुणेकरांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. हे नाही झालं तर पुणेकर दारात थांबू देणार नाहीच. पुणेरी पॅटर्न आम्हाला देखील माहिती आहे. कारण आम्हीदेखील पुणेकर आहोत. पुणे हे आमचं होमटाऊन आहे. आम्हाला जे प्रेम पुण्यावर आहे, ते बाहेरच्या लोकांचं नाही. सुप्रिया पुण्यात आली की, मोदी बागेत राहते. मी जिजाईला राहतो. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 

टँकर माफियांचा उल्लेख अजितदादांनी केला. मलाही हा अनुभव आला आहे. मी जिथे राहते तिथेही टँकर येतो. टँकरमाफिया शहरात वाढले आहेत. मेट्रोची शेवटची लाईन जोपर्यंत पूर्ण करावं लागेल, आम्ही मेट्रो यशस्वीरित्या चालू करू. या जाहीरनाम्यातल्या अनेक गोष्टी आम्ही आधीच करून दाखवल्या आहेत. अजितदादांनी सांगितलेली सगळी कामे आम्ही अनेक प्रभागात करून दाखवली आहेत. आरोग्यात कामं आम्ही केली आहेत. लोकांना परवडणारे शिक्षण सेवा आणि आरोग्य सेवा आम्ही दिल्या आहेत. वाहतूक कोंडीवर तोडगा काढणं आता गरजेचं आहे. यासाठी एक मोठा प्लॅन तयार झाला आहे. पुढच्या ५ वर्षात मोठा बदल पुण्यात झालेला आपल्याला दिसेल. पर्यावरण समतोल ठेवण्यासाठी आम्ही काम करू.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number