Maval NCP Jallosh : मावळमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; अजितदादांचा फोटो हाती घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष

मावळमधील जिल्हा परिषदेच्या सर्व 5 आणि पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे.

Maval NCP Jallosh : मावळमध्ये राष्ट्रवादीची एकहाती सत्ता; अजितदादांचा फोटो हाती घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष

Maval NCP Jallosh : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ऐतिहासिक कामगिरी करत भाजपला धोबीपछाड दिला आहे. मावळमधील जिल्हा परिषदेच्या सर्व 5 आणि पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली आहे. गेल्या 25 वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता होती, मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचा हा अभेद्य गड पूर्णपणे ताब्यात घेतला असून भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही.

अजितदादांच्या फोटोसह कार्यकर्त्यांचा भावूक जल्लोष 
हा विजय मिळवल्यानंतर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात अजित पवार यांचे फोटो होते आणि “अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. विजयाचा आनंद साजरा करत असतानाच, “आज हा आनंद सोहळा पाहायला अजितदादा आपल्यात नाहीत,” असे म्हणत अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते. या निकालाने मावळमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वावर मतदारांनी पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे.

सुनील शेळके यांचा मास्टरस्ट्रोक; बाळा भेगडेंना धूळ चारली 
मावळचे आमदार आणि अजितदादांचे कट्टर समर्थक सुनील शेळके यांनी या निवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली आहे. त्यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील भाजप पॅनेलला चारी मुंड्या चित केले. भाजपचा हा दारुण पराभव बाळा भेगडे यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीने अनेक जागा थेट भाजपकडून खेचून आणल्या आहेत.

हेही वाचा – Solapur ZP Election Results 2026: ‘भाजपचा सुपडा साफ करणे सोपे नाही’; पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी विरोधकांवर साधला निशाणा

मावळ जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार:

टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)
इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)
खरकाळे: दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)
कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)
सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)

जिल्हा परिषदेच्या या 5 जागांसोबतच पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवरही राष्ट्रवादीने विजय मिळवून मावळ तालुका भाजपमुक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number