त्र्यंबकेश्वर परिसरात तुफान पाऊस

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं आहे.

त्र्यंबकेश्वर परिसरात तुफान पाऊस

४ ऑगस्ट, २०२४, नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या दोन तासांपासून तुफान पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये पाणी साचलं आहे. कुशावर्त परिसरात असलेल्या बाजारपेठात रस्त्यावर गुडघाभर पाणी भरल्याने भाविकांचे हाल होत आहेत. मंदिराच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी मंदिरात शिरल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने भाविकांची त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या भाविकांना फटका बसत आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number