नाशिक: नाशकात मृतांच्या नातेवाईकांना होणारा त्रास होणार कमी करण्यासाठी नाशिक प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाशिक प्रशासनाने एका ऍपची निर्मिती केली आहे.
आता अंत्यसंस्कारासाठी http://www.cremation.nmc.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येऊ शकणार आहे. स्मशानभूमीत तासनतास प्रतिक्षा करावी लागू नये, यासाठी नाशिक प्रशासनाकडून ऑनलाइन ऍप बनवण्यात आले आहे. नाशिक शहरात २७ ठिकाणी स्मशानभूमी असून आता नोंदणी करून अंत्यसंस्कार करता येणार आहेत.