अवकाशात रॉकेट भरकटल्याप्रकरणी नासाने चीनला फटकारले

वॉशिंग्टन: चीनच्या अंतराळ मोहिमेतील लाँग मार्च 5B रॉकेट भरकटल्याने जगभरात चिंता निर्माण झाली होती. मात्र हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. त्यामुळे जगाची एक चिंता कमी झाली या रॉकेटवरून अमेरिका आणि चीनमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. कारण कोरोना नावाच संकट चीनमुळे संपुर्ण जगात पसरल आहे. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र चीन […]

अवकाशात रॉकेट भरकटल्याप्रकरणी नासाने चीनला फटकारले

वॉशिंग्टन: चीनच्या अंतराळ मोहिमेतील लाँग मार्च 5B रॉकेट भरकटल्याने जगभरात चिंता निर्माण झाली होती. मात्र हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. त्यामुळे जगाची एक चिंता कमी झाली या रॉकेटवरून अमेरिका आणि चीनमध्ये वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे. कारण कोरोना नावाच संकट चीनमुळे संपुर्ण जगात पसरल आहे. यामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र चीन यामधून पण काही शिकला नाही. पूर्ण पृथ्वीला संकटात टाकण्याच काम चीन करत असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेच्या नासाने चीनवर या मुद्यावरून टीकास्त्र सोडले आहे. चीनची अंतराळ संस्था आवश्यक जबाबदार मानके पूर्ण करण्यास अपयशी ठरली असल्याची टीका नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी केली आहे. चिनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील स्थानिक वेळ सकाळी १०.२४ वाजण्याच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत आले होते. हिंदी महासागरात या रॉकेटचे अवशेष कोसळले. मालदीवच्या हद्दीत या रॉकेटचे अवशेष कोसळले.

पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर या रॉकेटचा बहुतांशी भाग जळून खाक झाला होते. अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. चीनने अवकाशात पाठवलेल्या ‘लाँग मार्च 5B’ या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याचं वृत्त समोर येताचं जगात खळबळ उडाली होती. कोरोनाच्या संकटाशी झुंजत असलेल्या अनेक देशांची या रॉकेटने चिंता वाढवली होती. मात्र आता ही भीती दुर झाली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी म्हटले की, अंतराळ मोहिमा आखणाऱ्या देशांनी आपले एखादे यान, रॉकेट पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणत असताना पृथ्वीवरील लोकं आणि मालमत्तेचे नुकसान कमी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वच देशांनी जबाबादारीने वागणे अपेक्षित असून अंतराळ कार्यक्रमाबाबत पारदर्शकता बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या अंतराळ स्थानक केंद्राला आव्हान देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. चीनकडून अंतराळात स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली होती. रॉकेटचा हा तुकडा जमिनीवर कोसळण्याऐवजी समुद्रात कोसळण्याची शक्यता अधिक होती. चीनचा 2021-035B हे रॉकेट १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद होते. नियंत्रण गमावलेले हे रॉकेट दक्षिण-पूर्व अमेरिका, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन, पेरू, इक्वाडोर कोलंबिया, व्हेनेझुएला, दक्षिण युरोप, उत्तर किंवा मध्य आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण भारत किंवा ऑस्ट्रेलियाजवळ कोसळण्याची शक्यता असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number