‘१६ जणांसोबत नार्वेकरही अपात्र’

गेले बरेच दिवस टांगणीला लागलेला सत्तासंघर्षाचा महाफैसला ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. यात आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे न्यायालयाने सांगितले. परंतु, आता त्या १६ आमदारांसोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही अपात्र ठरतील असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. व्हीप हा राजकीय पक्षाचा लागू होतो. विधानसभेतील सदस्य व्हीप जारी करु शकत नाही हे […]

‘१६ जणांसोबत नार्वेकरही अपात्र’

गेले बरेच दिवस टांगणीला लागलेला सत्तासंघर्षाचा महाफैसला ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. यात आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असे न्यायालयाने सांगितले. परंतु, आता त्या १६ आमदारांसोबतच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही अपात्र ठरतील असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

व्हीप हा राजकीय पक्षाचा लागू होतो. विधानसभेतील सदस्य व्हीप जारी करु शकत नाही हे सर्व तपासूनच निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. परिणामी सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतला जाईल. तसेच कोणाचा व्हीप ग्राह्य धरावा आणि कोणाचा ग्राह्य धरु नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले नाही. मला सर्व तपासूनच निर्णय घ्यावा लागेल, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

तर, अध्यक्ष नार्वेकर हे बेकायदेशीर आहेत आणि यावर आम्ही न्यायालयात दाद मागणार असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच आमदार अपात्रतेच्या निर्णयाची जबाबदारी हि नार्वेकरांवर दिली असली तरी जेव्हा ते सोळा आमदार अपात्र ठरतील तेव्हा नार्वेकरही पायउतार होतील असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर हल्लाबोल केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number