पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवन बंदराचं शुक्रवारी भूमिपूजन होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवन बंदराचं शुक्रवारी भूमिपूजन होणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पत्रकार परिषद घेतली. या बंदराच्या माध्यमातून बारा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सोनोवाल यांनी केला. वाढवण बंदर हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असून या बंदरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचे देखील केंद्रीय मंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील बडे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number