मोदींचा रविवारी जळगाव दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत.

मोदींचा रविवारी जळगाव दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी महाराष्ट्रातील जळगाव आणि राजस्थानमधील जोधपूरला भेट देणार आहेत. सकाळी सव्वाअकरा वाजता ते लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. तर साडेचार वाजण्याच्या सुमाराला जोधपूर येथील राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान महाराष्ट्रात

पंतप्रधान जळगावला भेट देणार असून लखपती दीदी संमेलनात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकत्याच लखपती बनलेल्या नवीन अकरा लाख लखपती दीदींना ते सन्मानित करणार आहेत. त्यांना प्रमाणपत्र देणार आहेत. याशिवाय ते देशभरातील लखपती दीदींशी संवाद देखील साधणार आहेत.

पंतप्रधान  अडीच हजार कोटी रुपयांचा फिरता निधी जारी करतील, ज्याचा लाभ  ४.३ लाख बचत गटातील सुमारे ४८ लाख सदस्यांना होईल. याशिवाय ते पाच हजार कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करणार आहेत. त्याचा लाभ २.३५ लाख बचत गटातील २५.८ लाख सदस्यांना होईल.

लखपती दीदी योजनेच्या आरंभापासून एक कोटी महिला याआधीच लखपती दीदी झाल्या आहेत. तर तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांचा राजस्थान दौरा

पंतप्रधान जोधपूर येथील उच्च न्यायालयाच्या परिसरात आयोजित, राजस्थान उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी समारंभाच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते राजस्थान उच्च न्यायालय वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन देखील होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number