माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशी दौऱ्यावर होते. त्यामुळे मोदींना अरुण जेटली यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. मात्र परदेशी दौरा संपल्यानंतर पंतप्रधानांनी त्वरीत जेटली यांच्या निवास्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी मोदींनी निवास्थानी जाऊन श्रद्धांजली वाहिली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावेळी पंतप्रधान मोदी परदेशी दौऱ्यावर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेटलींच्या निधनाची माहिती मिळताच जेटली यांच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधत सांत्वन केले.
देशाच्या कामासाठी परदेशी दौऱ्यावर गेले असल्यामुळे दौरा अर्धवट सोडून येऊ नका असे रोहन ( जेटली यांचा मुलगा) यांनी मोदींना सांगितले.
यावेळी गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.