फादर ऑफ इंडिया म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महान नेते असून स्वभावाने सभ्य आणि चांगले व्यक्ती असल्याचे ट्रम्प म्हणाले. यापूर्वी भारतात वादावादीची परिस्थिती होती. मात्र मोदींनी वडिलांप्रमाणे भारताची परिस्थिती सांभाळली आहे. त्याचबरोबर ट्रम्पने एल्विस प्रेस्लीसोबत मोदींची तुलना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी महान नेते असून भावाने सभ्य आणि चांगले व्यक्ती आहेत.
यापूर्वी भारतात वादावादीची परिस्थिती होती. मात्र मोदींनी वडिलांप्रमाणे भारताची परिस्थिती सांभाळली आहे.
म्हणूनच मोदींचा उल्लेख फादर ऑफ इंडिया असा करत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एकमेकांची भेट घ्यावी.
तसेच चर्चेतून सकारात्मक आणि चांगली गोष्ट समोर येईल असे ट्रम्प म्हणाले.
तसेच मोदी सात दिवासांसाठी अमेरिकेत असताना हाऊडी मोदीचा कार्यक्रम टेक्सासमधील ह्युस्टन शहरात पार पडले.
यावेळी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाबाजी मोदींनी केली.
ट्रम्प केवळ माझेच नाही तर संपूर्ण भारताचे मित्र असल्याचे मोदी म्हणाले.