‘सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नारायण राणेंनी परवानगी नाकारली’ – विनायक राऊत

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर त्रुटीचे कारण देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप करीत खासदार विनायक राऊत यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावर नारायण राणे यांनी आपण विकास कामांमध्ये कधीही खोडा घालणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.   शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली […]

‘सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नारायण राणेंनी परवानगी नाकारली’ – विनायक राऊत

   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर त्रुटीचे कारण देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आशीर्वादाने परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप करीत खासदार विनायक राऊत यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. यावर नारायण राणे यांनी आपण विकास कामांमध्ये कधीही खोडा घालणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळाली पाहिजे, महाविद्यालय विद्यार्थी ऍडमिशनला आले असताना राष्ट्रीय आयुर्विज्ञानाने मान्यता रद्द करणे चुकीचे आहे. याप्रकरणी राजकीय दबाव आणला जात आहे असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले आहे. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी नाकारली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे. तसेच यावर नारायण राणे यांनी उत्तर देत विकास कामांमध्ये कधीही खोडा घालणार नाही, असे सांगितले आहे.

  सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाली. तसेच यातील तांत्रिक त्रुटी दूर करून केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाला पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान कोणाच्या दबावाला बळी पडून परवानगी नाकारली तर न्यायालयीन लढा दिला जाण्याचा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number