नंदुरबार रेल्वेमध्येच बनवला विलगीकरण कक्ष

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांच्या उपचारासाठी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे कोच उपचाराकरिता उपलब्ध व्हावी, असा पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून नंदुरबार येथील […]

नंदुरबार रेल्वेमध्येच बनवला विलगीकरण कक्ष

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही गंभीर परिस्थिती पाहता रुग्णांच्या उपचारासाठी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करून नंदुरबार जिल्ह्यासाठी कोविड रेल्वे कोच उपचाराकरिता उपलब्ध व्हावी, असा पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून नंदुरबार येथील रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक तीन या ठिकाणी रेल्वेचे कोविड कोच उपलब्ध झाले आहे.

या कोविड रेल्वेमध्ये वीस डबे असणार असून एका कोचमध्ये 16 ते 24 बेड असतील. या कोचमध्ये दोन जैवशौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच एका कोचमध्ये दोन ऑक्सिजन आणि कूलरची व्यवस्था असणार आहे. कोचमध्ये तीनशे ते चारशे रुग्ण कमी लक्षणे सदृश्य असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यात येईल. सदरच्या रेल्वे कोचमध्ये नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागामार्फत रुग्णांवर उपचार करण्यात येईल. तसेच या कोचच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे.

आजपासून रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार डॉ.हिना गावित यांनी दिली आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number