T20 World Cup 2026 : नवख्या नामिबियाची कडवी झुंज, पण टीम इंडियाचे गोलंदाज ठरले गेमचेंजर

गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या गट अ सामन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताने तब्बल 93 धावांसह नामिबियावर विजय मिळवला.

T20 World Cup 2026 : नवख्या नामिबियाची कडवी झुंज, पण टीम इंडियाचे गोलंदाज ठरले गेमचेंजर

गुरुवारी दिल्ली येथे झालेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या गट अ सामन्यात भारताने टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय मिळवला आहे. यावेळी भारताने तब्बल 93 धावांसह नामिबियावर विजय मिळवला. गुरुवारी 12 फेब्रुवारीला पार पडलेल्या भारत विरुद्ध नामिबिया या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचा मान दिला. भारताकडून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इशान किशन व संजू सॅमसनने संघाला दणक्यात सुरूवात केली. संजू सॅमसनने 8 चेंडूत 22 धावांची खेळी केली, तर दुसरीकडे इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी पॉवरप्लेमध्ये 83 धावा करत सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर उभारला. दरम्यान यावेळी हार्दिक पंड्याने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. 

हेही वाचा- India vs Namibia: भारताची स्फोटक फलंदाजी; भारताने नामिबियासमोर उभे केले 210 धावांचे महाकाय लक्ष्य
भारताकडून इशान किशनने 24 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावांची वादळी खेळी केली तर तिलक वर्माने देखील 25 धावांची खेळी केली. यावेळी हार्दिक पांड्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 52 धावा केल्या. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवने 12 धावा आणि शिवम दुबेने 23 धावांचं योगदान दिलं. यासोबत भारताने नामिबिया समोर 209 धावांचे आव्हान दिले. 
तर दुसरीकडे नामिबियाकडून कर्णधार गेराहर्ड इरास्मसने 4 षटकांत 20 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. तसेच बेन शिकोन्गो, स्मिट, बेर्नार्ड यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा- T20 World Cup: 'आम्ही 'मॅच मोड'मध्ये आलोय'; भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर तिलक वर्माने स्पष्टच सांगितलं…
नामिबियाला भारताच्या गोलंदाजांनी जास्त वेळ मैदानावर टिकूच दिले नाही. भारताकडून वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट्स नामिबियाच्या फलंदाजांचा फर्शा पाडला. तर हार्दिक पंड्या व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, शिवम दुबे व बुमराह यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या. भारताने दिलेल्या 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबिया संघ अवघ्या 116 धावांवर संपला. 120 विश्वचषक इतिहासातील हा भारताचा सर्वात मोठा विजय आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number