Nagpur Election 2026: नागपूर महापालिका निवडणूक; गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची ‘स्मार्ट’ रणनीती; तर जनसामान्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचा एल्गार

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Nagpur Election 2026: नागपूर महापालिका निवडणूक; गडकरी-फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची ‘स्मार्ट’ रणनीती; तर जनसामान्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचा एल्गार

नागपूर: विदर्भाच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या नागपुरात नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागताच राजकीय घडामोडी बदलत असून, आता सर्वांच्या नजरा नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाकडे वळल्या आहेत. गेल्या 15 वर्षांपासून सलग तीन वेळा मनपावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षासमोर आता चौथ्यांदा विजय मिळवून सत्ता राखण्याचे मोठे आव्हान आहे. नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस यांचे होमपिच असल्याने, ही निवडणूक भाजपसाठी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढत नसून ती एक अस्तित्वाची लढाई बनली आहे.

अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांतील घवघवीत यशानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून, याच पार्श्वभूमीवर गडकरींच्या निवासस्थानी महत्त्वाची रणनीती आखली गेली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत प्रभागनिहाय तयारी आणि 151 पैकी 120 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

हेही वाचा: Girish Mahajan: 'प्रेम, युद्ध अन् निवडणुकीत सर्व काही माफ…'; गिरीश महाजनांचा मित्रपक्षांना सल्ला

भाजप या निवडणुकीत मेट्रो प्रकल्प, सिमेंटचे रस्ते, उड्डाणपूल आणि स्मार्ट सिटी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या 'विकासाच्या अजेंड्यावर' भर देत आहे. मात्र, पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटप करताना अंतर्गत बंडखोरी रोखणे हे नेत्यांसमोर मोठे पेचप्रसंग निर्माण करू शकते. दुसरीकडे, काँग्रेस या निवडणुकीला आपल्या राजकीय आगमनासाठी मोठी संधी मानत आहे.

शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे पक्षाचे मनोबल वाढलेले दिसत आहे. बेरोजगारी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पावसाळ्यात तुंबणारी गटारे आणि वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था या मुद्द्यांवरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपला घेरण्याची तयारी केली आहे.

राजकीय समीकरणांचा विचार करता, नागपुरात भाजपची संघटनशक्ती महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या तुलनेत अधिक भक्कम असल्याने पक्ष स्वबळावर लढण्यास अधिक उत्सुक असल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा प्रभाव मोठा असला तरी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीनंतर मतविभाजनाचा फटका बसू नये, याची खबरदारी त्यांना घ्यावी लागणार आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकून एकतर्फी बहुमत मिळवले होते, तर काँग्रेसच्या केवळ 29 जागा आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसमोर जनतेच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहे, तर विरोधकांसमोर सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचे कसब पणाला लागणार आहे.

हेही वाचा: Dharashiv Accident : कळंब-लातूर रस्त्यावर हिट अँड रनची घटना; कारने ऊसतोड मजुरांना उडवलं, 7 जण जखमी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number