Attack on BJP Corporator: भरबाजारात थरार ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून भरचौकात खंजरने वार

ते गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

Attack on BJP Corporator: भरबाजारात थरार ! भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला; जुन्या वादातून भरचौकात खंजरने वार

नागपूर: उपराजधानीत गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, यावेळी थेट राजकीय कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले आहे. नागपूरच्या नवनिर्वाचित भाजप नगरसेविका मानसी शिमले यांचे पती नितीन शिमले यांच्यावर रविवारी रात्री सशस्त्र हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ‘मैत्रीतली दरी आणि पैशाची उधारी’ यातून हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, या घटनेने नागपूरच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुनी शुक्रवारी परिसरात रविवारी रात्रीच्या शांततेत अचानक शस्त्रांच्या खणखणाटाने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. आरोपी सोनू ठाकरे उर्फ पैलवान याने नितीन शिमले यांच्यावर धारदार शस्त्राने एकामागून एक वार केले. या हल्ल्यात शिमले गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून समजते.

धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोर आणि जखमी हे एकेकाळचे जिवलग मित्र होते. जुन्या हत्येच्या एका प्रकरणात नितीन शिमले आणि महेश ठाकरे (सोनूचा साथीदार) हे दोघेही सहआरोपी होते. मात्र, काळाच्या ओघात मैत्रीत मिठाचा खडा पडला. पैशाच्या व्यवहारावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. “विळ्या-भोपळ्याचे सख्य” झालेल्या या वादाने अखेर रविवारी रात्री हिंसक वळण घेतले आणि जुन्या मैत्रीचा अंत रक्ताच्या थारोळ्यात झाला.

हेही वाचा: Noida Couple’s Death Mystery : तो अखेरचा संदेश, बंद कारमध्ये दोघांचा मृतदेह, हातात पिस्तुल…; तरुणाच्या गूढ मृत्यूनं नोएडा हादरलं

घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. आरोपी सोनू ठाकरे हा घटनेनंतर लागलीच फरार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत. “गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

या हल्ल्यामुळे नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीवर भरचौकात हल्ला करण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये आल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जुनी शुक्रवारी परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

राजकीय वर्चस्व आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हा ‘कॉकटेल’ क्राईम नागपूरसाठी नवा नाही, मात्र ऐन निवडणुकीनंतरच्या काळात अशा प्रकारे नगरसेविकेच्या पतीला लक्ष्य केल्याने या प्रकरणाला आता राजकीय वलय प्राप्त झाले आहे. पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सूत्रधारांचा शोध घेतात की हा केवळ वैयक्तिक वादाचा शेवट ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा: Rajpal Yadav: राजपाल यादव यांच्या तुरुंगातील सुटकेच्या चर्चांमागचं खरं सत्य काय? पत्नी राधा यादव यांचा मोठा खुलासा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number