नागपूर खंडपीठाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहेत. याप्रकरणी, 8 मे रोजी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.

नागपूर खंडपीठाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले आहेत. त्यांना 7 मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, याप्रकरणी 8 मे रोजी पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या 26 उमेदवारांनी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या विजयाला आव्हान दिले आहे. दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी फडणवीसांविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांना आव्हान देणाऱ्या याचिकेत नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना समन्स बजावले आहेत. याचिकेमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, निवडणुकीमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धती वापरल्या गेल्या आहेत.

'या' नेत्यांना देखील समन्स बजावले

बुधवारी न्यायालयाने भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादीचे मनोज कायंदे आणि भाजपचे देवराव भोंगळे यांनादेखील समन्स बजावले. त्यानंतर गुरुवारी भाजपचे मोहन मते आणि चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनादेखील न्यायालयाने नोटीस पाठवली.

हेही वाचा: काँग्रेसला मोठा धक्का; लवकरच संग्राम थोपटे करणार भाजपमध्ये प्रवेश

याचिकाकर्त्यांचा आरोप

ईव्हीएम संदर्भात याचिकाकर्त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा आरोप आहे. त्यासोबतच, पराभूत उमेदवारांना सीसीटीव्ही फुटेज आणि फॉर्म क्रमांक 17 दिला जात नाही, असेही म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number