मविआची विधानसभेसाठी ७ ऑगस्टला बैठक

महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. जागावाटपाबाबत मविआच्या नेत्यांची ७ ऑगस्टला बैठक होणार आहे.

मविआची विधानसभेसाठी ७ ऑगस्टला बैठक

मुंबई : महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी करत आहे. जागावाटपाबाबत मविआच्या नेत्यांची ७ ऑगस्टला बैठक होणार आहे. या बैठकीबाबत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिउबाठा प्रमुख उद्धव यांच्याशी बातचीत केली. मविआकडून बैठकीची तारीख जाहीर करण्यात आली. या बैठकीला आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित असतील. 

महाराष्ट्रात २०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात आली. यामुळे यंदाही ऑक्टोबर महिन्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या विधानसभेत मविआ विरोधात आहे. त्यांचे विधानसभेत ७८ आणि विधान परिषदेत २१ आमदार आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number