Murlidhar Mohol: "29 वर्षांपूर्वी…" मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल; एक महिना सक्तीची विश्रांती

पुण्याचे खासदार, भाजप नेते आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Murlidhar Mohol: &quot29 वर्षांपूर्वी…&quot मुरलीधर मोहोळ रुग्णालयात दाखल; एक महिना सक्तीची विश्रांती

पुण्याचे खासदार, भाजप नेते आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पायाच्या दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पार पडली. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांना डॉक्टरांनी किमान एक महिना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मुरलीधर मोहोळ हे राजकारणी सोबतच एक निष्णात कुस्तीगीर देखील आहेत. 29 वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. ही जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

हेही वाचा- Pune Metro: पुणेकरांचा ‘लास्ट माईल’ प्रवास आता होणार सुखकर! नळ स्टॉप मेट्रो स्थानकावर फीडर रिक्षांचा श्रीगणेशा; अवघ्या 20 रुपयांत गाठा घर
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. मुरलीधर मोहोळ ट्वीट करत म्हणाले की, “क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती! २९ वर्षांपूर्वी… कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळेच कुस्ती कायमची सुटली… इतकी वर्षे दुर्लक्ष केलं पण आता २९ वर्षांनंतर हळूहळू तो त्रास वाढू लागला, शेवटी डॅाक्टरांनी ह्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितलं. त्यामुळे किमान एक महिन्याकरता ही विश्रांती! खरंतर संसदेचं अधिवेशन सुरू असतानाही शस्त्रक्रिया करावी लागली. अधिवेशन, कामानिमित्त देशभरातील प्रवास, माझ्या पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क तसेच इतर कामे… आणि शिवाय यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा… या सगळ्याचं काय? दुखापतीच्या त्रासापेक्षा या सगळ्याचा त्रास जास्त होतोय. पण मला माहितीये तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादच्या जोरावर मी लवकरच बरा होऊन महिन्याभरातच पुन्हा तुम्हा सर्वांच्या सेवेत हजर होईन, पहिल्यापेक्षा जास्त जोमाने…”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number