सुरेंद्रगढ येथील कांचनमाला मनपा शाळेचा स्लॅबचा भाग कोसळला, मोडकळीस आलेल्या इमारतीत सुरु आहेत वर्ग, नागपूर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी शाळा सुरु होती मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. शाळेची संपूर्ण इमारत मोडकळीस आली असून जागोजागी प्लास्टर गळून पडत आहे. अनेक जागी भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या असून जागोजागी पावसाचे पाणी गळत आहे. सुरेंद्रगढ येथे महानगरपालिकेच्या शाळेत स्लॅबचा भाग कोसळण्साची ही दुसरी घटना आहे.
गेल्यावर्षी हिंदी माध्यमीक शाळेत असाच प्रकार घडला होता. नंतर ही इमारत सील करण्यात आली. नागपुरात मनपा शाळेचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मनपाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी, शिक्षकांचा जीव धोक्यात आहे. जीव धोक्यात आहे तरी महनगरपालिका कधी लक्ष घालणार का असेच मुलांचे आणि शिक्षकांचा जीव धोक्यात घालणार आहे.