Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

या संवेदनशील मुद्द्यावर विरोधकांची भूमिका काय असेल आणि सरकार काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitesh Rane: ‘मुंब्य्राचं नाव बदलून मुंब्रादेवी करणार’; जाहीर सभेत नितेश राणेंचा थेट इशारा

ठाणे: राज्यात शहरांच्या नावबदलावरून अधूनमधून राजकीय चर्चा रंगत असताना आता मुंब्रा नावाच्या मुद्द्यावरून नवे वादंग निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी जाहीर सभेत मुंब्राचे नाव “मुंब्रा देवी” करण्याची घोषणा करत खळबळ उडवली आहे.

जाहीर सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, “तुम्ही ज्या पद्धतीने येथे भगवे वातावरण निर्माण केले आहे, ही तर फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत प्रत्येक घरावर भगवा झेंडा फडकत नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.”

तसेच त्यांनी पुढे दावा करत म्हटले की, “आम्ही इस्लामपूरचे नाव ‘ईश्वरपूर’ करून दाखवले, त्याचप्रमाणे मुंब्रा हे नाव ‘मुंब्रा देवी’ करून दाखवू. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही.”

हेही वाचा: Maharashtra Weather Update: आज याजिल्ह्यांमध्ये कोसळणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

नावबदलावरून पुन्हा राजकारण तापणार?

मुंबईत झालेल्या या जाहीर सभेनंतर मुंब्रा परिसरात आणि राज्याच्या राजकारणात या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरांच्या नावबदलाचा मुद्दा हा नेहमीच संवेदनशील ठरत आला असून, या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या विधानावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच प्रशासन किंवा सरकार या संदर्भात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, मुंब्राच्या नावबदलाच्या मुद्द्यावरून आगामी काळात मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा: Indian Airlines Flight: मध्य पूर्वेतील तणावामुळे भारतामधून यातीन देशांसाठी विमान उड्डाणे वाढणार, आखाती देशांमधील अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय मार्गांमध्ये मोठे बदल

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number