माहीममध्ये सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंना हरवणारे महेश सावंत रुग्णालयात

विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवमकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या दोघांचा पराभव केला. जायंट किलर सावंत सध्या रुग्णालयात आहेत.

माहीममध्ये सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंना हरवणारे महेश सावंत रुग्णालयात

मुंबई : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी माजी आमदार सदा सरवमकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या दोघांचा पराभव केला. जायंट किलर ठरलेल्या महेश सावंत यांचे निवडणुकीतील दणदणीत विजयामुळे कौतुक होत होते. पण गुरुवारी संध्याकाळपासून महेश सावंत वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. 

निवडणुकीतील कामाच्या ताणामुळे महेश सावंत यांना त्रास झाला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महेश सावंत यांना लिलावती रुग्णालयात दाखल करुन घेतले. महेश सावंत यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांच्या  सल्ल्याने महेश सावंत लिलावती रुग्णालयात विश्रांती घेत आहेत, त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील दोन ते तीन दिवस डॉक्टर महेश सावंत यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवतील. अपेक्षित सुधारणा दिसल्यास महेश सावंत यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. 

माहीम विधानसभा मतदारसंघ – निवडणूक निकाल

  1. महेश सावंत, उद्धव ठाकरे गट – 50 हजार 213 मते मिळाली, 1316 मतांनी विजय
  2. सदा सरवणकर, शिवसेना – 48 हजार 897 मते, 1316 मतांनी पराभव
  3. अमित राज ठाकरे, मनसे – 33 हजार 062 मते 17 हजार 151 मतांनी पराभव

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number