एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने लसखरेदी लांबणीवर

मुंबई: मुंबई महापालिकेने एक कोटी लशींच्या खरेदीसाठी मागवलेल्या जागतिक निविदेला मंगळवारपर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पालिकेने आणखी सात दिवस म्हणजे २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लसखरेदी लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्याचे ठरवले असून, एक कोटी लशी खरेदी करण्यासाठी १२ मे रोजी जागतिक निविदा अर्ज […]

एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने लसखरेदी लांबणीवर

मुंबई: मुंबई महापालिकेने एक कोटी लशींच्या खरेदीसाठी मागवलेल्या जागतिक निविदेला मंगळवारपर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पालिकेने आणखी सात दिवस म्हणजे २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे लसखरेदी लांबणीवर पडणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्याचे ठरवले असून, एक कोटी लशी खरेदी करण्यासाठी १२ मे रोजी जागतिक निविदा अर्ज मागवले होते. निविदा प्रक्रियेत भाग घेणाऱ्या कंपन्याच्या शंका आणि सूचना १६ मेपर्यंत, तसेच त्यांचे निरसन १७ मे रोजी करून १८ मेपर्यंत निविदा भरण्याची मुदत दिली होती.

शेवटच्या तारखेपर्यंत एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने आणखी एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या जागतिक निविदा मागण्याची घोषणा ठाणे महापालिकेसह इतरही काही महापालिकांनी याआधी केलेली आहे. मात्र मुंबई महापालिकेचा अनुभव पाहता त्यास किती प्रतिसाद मिळेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number