मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पांतर्गत समुद्रातील पुलाच्या पहिल्या गर्डर उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. (Mumbai Trans harbor Link) मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी गर्डरने झाली. या गर्डरचं वजन 1000 मे. टन आहे. या गर्डरची वजन उचलण्याची क्षमता 1400 मे. […]

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते

मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पांतर्गत समुद्रातील पुलाच्या पहिल्या गर्डर उभारणीच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. (Mumbai Trans harbor Link)

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाच्या उभारणीतील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी गर्डरने झाली. या गर्डरचं वजन 1000 मे. टन आहे. या गर्डरची वजन उचलण्याची क्षमता 1400 मे. टन आहे.

काय आहे बा मुंबई ट्रान्सहर्बर लिंक प्रकल्प?

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पात शिवडी ते न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी पुलाचा अंतर्भाव आहे.

या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे.

या पुलाला मुंबई शहरातील शिवडी आणि मुख्य भूमीवरील शिवाजी नगर तसंच राष्ट्रीय महामार्ग-4 B वर चिर्ले गावाजवळ आंतरबदल प्रस्तावित आहेत.

हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा समुद्रावरील पूल ठरणार आहे.

हा प्रकल्प जपान आंतरराष्ट्रीय सहकार संस्थेच्या कर्जसहाय्याने राबवण्यात येतोय.

या प्रकल्पाचं बांधकाम 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे आणि 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे.

सेगमेंट कास्टींग आणि तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचं काम प्रगतीपथावर आहे.

या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षांचा आहे. यानुसार सप्टेंबर-2022 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number