मुंबई – शनिवारपासून दहा टक्के पाणीकपात

मुंबई, २८ जून २०२३, प्रतिनिधी: मुंबईकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मुंबईत पाणीकपात १ जुलैपासून लागू होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईला तानसा, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा या ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातोय. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही धरणांच्या पाणलोटक्षेतातही पुरेसा पाऊस झाला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ धरणांमध्ये केवळ […]

मुंबई – शनिवारपासून दहा टक्के पाणीकपात

मुंबई, २८ जून २०२३, प्रतिनिधी: मुंबईकरांवर ऐन पावसाळ्यात पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मुंबईत पाणीकपात १ जुलैपासून लागू होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबईला तानसा, मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, विहार, तुळशी, मध्य वैतरणा या ७ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातोय. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही धरणांच्या पाणलोटक्षेतातही पुरेसा पाऊस झाला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ धरणांमध्ये केवळ १२ टक्के पाणीसाठा उरलाय. त्यामुळे, मुसळधार पाऊस झाला नाही तर, मुंबई महानगरपालिका पाणीकपात करण्याची शक्यता आहे. तसंच ही पाणीकपात १ जुलैपासून लागू होण्याचा अंदाज आहे.

भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील १.५ लाख दशलक्ष लीटरचा राखीव पाणीसाठा राज्य सरकारनं उपलब्ध करून दिल्यानं पालिकेला जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यात मदत होईल. जलसंपदा विभागाने १ जुलैपासून १० टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव तयार केला असून, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून केलं जातंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number