Mumbai New Mayor : तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर बसणार; रितू तावडे काय म्हणाल्या?

आज महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी विराजमान होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Mumbai New Mayor : तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर बसणार; रितू तावडे काय म्हणाल्या?

आज महापौर आणि उपमहापौर मुंबई महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहेत आणि यासाठी महायुती कढून तयारी करण्यात आलेली आहे. पण या अगोदर भाजपचे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत. दरम्यान आज महापौर पदी रितू तावडे आणि उपमहापौर पदी संजय घाडी विराजमान होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत आणि संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगवमय करण्यात आलं आहे या संदर्भात रितू तावडे यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे. 

हेही वाचा- BJP Strict Action: आधी पक्षाला नडला, आता पक्षाबाहेर काढला; शिस्त मोडणाऱ्या भाजपच्या 69 शिलेदारांवर पक्षाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’
रितू तावडे म्हणाल्या की, “प्रश्नच नाही ज्यांनी जे नेहमी आपल्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले असे आपले लाडक्या बहिणीचे लाडका भाऊ देवा भाऊ यांनी जे म्हटलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि माझी लाडकी बहीण याठिकाणी सर्वसाधारण माझ्यासारख्या कार्यकर्तीला या ठिकाणी हा बहुमान दिल आहे. त्यासाठी मी भारतीय जनता पक्षाचे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व वरिष्ठ नेते यांचे मी खूप खूप या ठिकाणी आभार मानते. भारतीय जनता पक्षाचा जवळपास 44 वर्षांनी महापौर बसणार आहे. हा बहुमान भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. सर्व जे कार्यकर्ते सातत्याने जमिनीवर राहून जनतेच्या सेवेसाठी काम करत असतात आणि त्या त्यांच्या सगळ्यांच्या कष्टातून या ठिकाणी महायुतीचे 118 नगरसेवक महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि हा बहुमान मिळालाय तर अथर्थातच हा आनंद भरपूर आहे”.

“मी कायम बोलत आली आहे. आज मी त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी माल्यार्पण होणार आहे. आहे त्यांचा आशीर्वाद घेणार आहे आणि या ठिकाणी येणार आहे तर मी वारंवार एकच सांगत आले आले आहे की या ठिकाणी महापौर म्हणून नाही मुंबईची सेवक म्हणून मुंबईकरांची सेवा करण्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक त्या ठिकाणी उतरणार आहोत. मुंबई भगवी आहे, महाराष्ट्र हा भगवा आहे, आणि भारतही भगवा आहे म्हणून आम्ही भगवे फेटे परिधान केले आहे. मी आताही तेच बोलते मूळ मुंबईकर हा टॅक्स प्लेयर आहे. मुंबईकरांनी ही घडवलेली मुंबई आहे आणि मुंबईकरांना जर फुटपाथ नसेल चालायला आणि तो जर तो फुटपाथ या अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांनी जर तो एनक्रोच केला असेल तर ते काढण्याचं काम नक्की करणार”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number