मुंबई – नागपूर महामार्गाची दुरवस्था

मुंबई-नागपूर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.

मुंबई – नागपूर महामार्गाची दुरवस्था

धुळे : धुळे शहरालगत असलेल्या मुंबईनागपूर महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास रोडला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गालगत शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. त्यामुळे रुग्णांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गावरील काम रखडल्यामुळे या ठिकाणी खड्डे पडले आहे. संथ गतीने सुरू असलेले काम त्वरित सुरू करावे, खड्डे बुजवावे आणि वाहनधारकांना होणाऱ्या त्रासापासून दूर करावे अशी मागणी सर्वसामान्य वाहनधारक करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number