Mumbai Minor Girls Abortion : मुंबईत गर्भपाताचे प्रमाण वाढले;दरवर्षी 20 हजारांहून अधिक गर्भपात, अल्पवयीन मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

Mumbai Minor Girls Abortion : मुंबईत गर्भपाताचे प्रमाण वाढले;दरवर्षी 20 हजारांहून अधिक गर्भपात, अल्पवयीन मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

मुंबई शहरात दरवर्षी 20 हजारांहून अधिक गर्भपात केसेस नोंदवल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींच्या गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

आरोग्य विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, शहरातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपाताच्या केसेस मोठ्या प्रमाणात नोंदवल्या जात आहेत. यामध्ये अनियोजित गर्भधारणा, सामाजिक दबाव, तसेच माहितीच्या अभावामुळे होणाऱ्या निर्णयांचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अल्पवयीन मुलींच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने बालविवाह, लैंगिक शोषण आणि अपुरी लैंगिक शिक्षण व्यवस्था यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शाळा पातळीवर व्यापक जनजागृती आणि समुपदेशनाची गरज आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, सुरक्षित गर्भपात सेवा उपलब्ध असल्या तरीही अनेक प्रकरणे उशिरा लक्षात येतात, ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर मार्गदर्शन आणि आरोग्य तपासणी अत्यंत आवश्यक आहे. सरकार आणि आरोग्य विभागाने या वाढत्या ट्रेंडवर लक्ष ठेवून योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. तसेच किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक शिक्षण आणि जागरूकता वाढवणे हा दीर्घकालीन उपाय असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number