मुंबई: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई मेट्रोच्या लाईन 2A आणि 7 वर काही तांत्रिक बदलांमुळे सेवांमुळे तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. यामुळे रोजच्या प्रवासासाठी मेट्रोचा वापर करणाऱ्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
प्रशासनाने मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेला आणि सोयीला प्राधान्य देत बदल लागू केले आहेत. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मेट्रोकडून करण्यात आले आहे.
Service Update | Metro Lines 2A & 7 Due to an operational adjustment, services have been temporarily modified for some time. ✅ Line 2A: Services continue from Andheri West ↔️ Dahisar East (both lines) ✅ Short Loop Service: Trains will run between Gundavali ↔️ Aarey (both… — Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) September 24, 2025
मेट्रो सेवांमध्ये नेमके काय बदल झाले?
सध्या मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर काही विशेष बदल करण्यात आले असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.
लाईन 2A (Line 2A): या मार्गावरील सेवा अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्वपर्यंत दोन्ही लाईन्सवर नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
शॉर्ट लूप सर्व्हिस : गुंडावली आणि आरे दरम्यान ‘शॉर्ट लूप सर्विस’ सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ, या दोन स्थानकांदरम्यान गाड्या मर्यादित अंतरासाठी धावतील.
सिंगल लाईन ऑपरेशन : ओव्रीपाडा आणि आरे दरम्यान दोन्ही मार्गांवर फक्त एकाच लाईनवर वाहतूक सुरू आहे.