मुंबईत सोमवारी 39 हजार 300 लाभार्थ्यांना कोरोनाविरोधात लस मिळाली

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून मुंबईत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. मात्र 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली होती. कोरोनाबाधितांचे देशात सर्वाधिक प्रमाण हे मुंबईत आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबई शहरात आज 39 […]

मुंबईत सोमवारी 39 हजार 300 लाभार्थ्यांना कोरोनाविरोधात लस मिळाली

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून मुंबईत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. मात्र 1 मार्चपासून 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणास
सुरुवात झाली होती. कोरोनाबाधितांचे देशात सर्वाधिक प्रमाण हे मुंबईत आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबई शहरात आज 39 हजार 300 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण 17 लाख 07 हजार 928 लाभार्थ्यांना
लस देण्यात आली.

 

लसीकरणाची आकडेवारी –
मुंबईत सोमवारी 39 हजार 300 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 32 हजार 834 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 466 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 17 लाख 7 हजार 928 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे शिवाय त्यात 15
लाख 12 हजार 611 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 95 हजार 317 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 2 लाख 59 हजार 41 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 81 हजार 986 फ्रंटलाईन वर्कर, 6 लाख 76 हजार 204 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59
वर्षांमधील गंभीर आजार असलेल्या 4 लाख 90 हजार 697 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

असं झालं लसीकरण –
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 27 हजार 184 तर आजपर्यंत 11 लाख 22 हजार 580 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 605 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 14 हजार
035 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 8 हजार 511 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 4 लाख 71 हजार 313 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण

* आरोग्य कर्मचारी – 2,59,041

* फ्रंटलाईन वर्कर – 2,81,986

* ज्येष्ठ नागरिक – 6,76,20445

* ते 59 वय – 4,90,697

* एकूण – 17,07,928

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number