मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने मुंबईतील विविध प्रभागांमधून आपल्या 45 उमेदवारांची अंतिम यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे.
सामाजिक समता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची निवड करताना 'सामाजिक समता' आणि 'बहुजन प्रतिनिधित्व' या सूत्रावर भर दिला आहे. मुंबईतील स्थानिक प्रश्न, झोपडपट्टी पुनर्वसन, पाणी आणि आरोग्याच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या कार्यकर्त्यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.
हेही वाचा: Atharva Sudame: सात दिवसांत व्हिडीओ हटवा, अन्यथा… PMPML कडून अथर्व सुदामेला खडेबोल
वंचित बहुजन आघाडी – मुंबई महानगरपालिका उमेदवारांची यादी
1. वार्ड 24 – सरोज दिलिप मगर
2. वार्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे
3. वार्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड
4. वार्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश
5. वार्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी
6. वार्ड 54 – राहुल ठोके
7. वार्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे
8. वार्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख
9. वार्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर
10. वार्ड 73 – स्नेहा मनोज जाधव
11. वार्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर
12. वार्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव
13. वार्ड 88 – निधी संदीप मोरे
14. वार्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता
15. वार्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे
16. वार्ड 107 – वैशाली संजय सकपाळ
17. वार्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे
18. वार्ड 111 – अँड रितेश केणी
19. वार्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे
20. वार्ड 114 – सिमा निनाद इंगळे
21. वार्ड 118 – सुनिता अंकुश वीर
22. वार्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे
23. वार्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने
24. वार्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे
25. वार्ड 123 – यादव राम गोविंद बलधर
26. वार्ड 124 – रीता सुहास भोसले
27. वार्ड 127 – वर्षा कैलास थोरात
28. वार्ड 139 – स्नेहल सोहनी
29. वार्ड 146 – सतिश वामन राजगुरू
30. वार्ड 155 – पवार ज्योती परशुराम
31. वार्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे
32. वार्ड 160 – गौतम भिमराव हराळ
33. वार्ड 164 – आशिष प्रभु जाधव
34. वार्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर
35. वार्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे
36. वार्ड 177 – कुमुद विकास वरेकर
37. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर
38. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)
39. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन
40. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे
41. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम
42. वार्ड 199 – नंदिनी गौतम जाधव
43. वार्ड 202 – प्रमोद नाना जाधव
44. वार्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे
45. वार्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ
मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार
46. वार्ड 116 – राजकन्या विश्वास सरदार
47. वार्ड 125 – सुमित कासारे
48. वार्ड 133 – सुप्रीया मनोज जाधव
49. वार्ड 140 – सोहन दादु सदामस्त
50. वार्ड 181 – अजिंक्य पगारे
काँग्रेससोबतच्या युतीचे नवे समीकरण गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू होती. आता ही युती प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने मतांचे विभाजन रोखण्यात या दोन्ही पक्षांना किती यश येते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
अंतिम यादीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वंचित बहुजन आघाडीने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. "मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी आम्ही ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत," असे वंचितच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे या उमेदवारांचे बळ वाढले असून, मुंबई महापालिकेत नवी सत्तासमीकरणे मांडण्यासाठी ही युती सज्ज झाली आहे.