BMC Election 2026: मुलुंडचा आखाडा तापला! राष्ट्रवादीचा अर्ज बाद, पण राऊतांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पाहा कोण देणार सोमय्यांच्या मुलाला आव्हान

मुलुंडची ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे होती. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेले.

BMC Election 2026: मुलुंडचा आखाडा तापला! राष्ट्रवादीचा अर्ज बाद, पण राऊतांचा ‘मास्टरस्ट्रोक’; पाहा कोण देणार सोमय्यांच्या मुलाला आव्हान

मुंबई: मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 107 मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांची बिनविरोध निवड होणार, अशा चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या निवडणुकीत नाट्यमय वळण आणले असून, नील सोमय्या यांच्या विरोधात दिनेश जाधव यांच्या रूपाने ‘पुरस्कृत’ उमेदवार मैदानात उतरवला आहे. यामुळे सोमय्यांसाठी अत्यंत सोपी मानली जाणारी ही निवडणूक आता ‘काटे की टक्कर’ ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर कडाडून टीका केली. “किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. मराठी भाषेच्या सक्तीला विरोध करण्यापासून ते मराठी उद्योजकांना लक्ष्य करण्यापर्यंत त्यांनी नेहमीच महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली आहे,” असा आरोप राऊतांनी केला. अशा व्यक्तीच्या मुलाला बिनविरोध निवडून देणे शिवसेनेच्या तत्त्वात बसत नाही, असे सांगत त्यांनी नील सोमय्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

मुलुंडची ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे होती. मात्र, राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेले. राऊत यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, “आम्ही राष्ट्रवादीला आधीच ही जागा नाजूक असल्याचे सांगितले होते. अर्ज बाद झाल्याने तिथे ‘बिनविरोध’चा जो काही घोटाळा करण्याचा प्रयत्न झाला, तो आम्ही उधळून लावला आहे.” शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक दिनेश जाधव यांचा अपक्ष अर्ज आधीच दाखल असल्याने ठाकरे गटाने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

हेही वाचा: Donald Trump-Venezuela Update : बनावट घर, महिन्यांचे रिहर्सल, सीआयएचे स्रोत आणि… अशा प्रकारे झालं 'ऑपरेशन अ‍ॅब्सोल्युट रिझॉल्व'

दिनेश जाधव हे शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार असले, तरी तांत्रिक कारणांमुळे त्यांना ‘मशाल’ हे अधिकृत चिन्ह मिळू शकलेले नाही. त्यांना ‘दूरदर्शन संच’ (टीव्ही) हे चिन्ह मिळाले आहे. तरीही संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, चिन्ह कोणतेही असले तरी ही लढाई वैचारिक आहे. “मुलुंडचे ‘पोपटलाल’ (नील सोमय्या) बिनविरोध आलो म्हणून नाचत होते, पण आता त्यांना तिथे संघर्ष करावा लागेल,” असा टोला त्यांनी लगावला.

संजय राऊत यांच्या घोषणेनंतर वॉर्ड 107 मध्ये आता राजकीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. “सर्व मराठी माणसे आणि मुंबईकर एकवटतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल,” असा दावा शिवसेनेने केला आहे. किरीट सोमय्या यांनी केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून केलेल्या कारवाया आणि त्यानंतर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी घेतलेली भूमिका यावरून राऊतांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे मनसुबे ओळखूनच शिवसेनेने हा ‘मास्टरस्ट्रोक’ खेळल्याचे बोलले जात आहे.

ज्या वॉर्डमध्ये सोमय्या बिनविरोध निवडून येण्याचे स्वप्न पाहत होते, तिथे आता शिवसेनेच्या या डावामुळे दिनेश जाधव यांचे पारडे जड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोमय्यांच्या विरोधात महाविकास आघाडीची मते आता जाधव यांच्याकडे वळवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकद लावणार आहे. यामुळे आगामी काळात मुलुंडचा प्रचार अधिक आक्रमक आणि व्यक्तिगत पातळीवर जाण्याची चिन्हे असून, नील सोमय्यांसाठी ही निवडणूक आता वाटते तितकी सोपी राहिलेली नाही.

हेही वाचा: Gulabrao Patil: 'सरकारमध्ये गोड बोलावं लागतं', गुलाबराव पाटलांची 'नटखट' फटकेबाजी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number