Car Accident: दादांनंतर आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीच्या जीवाला धोका? गाडीला जोरदार धडक; प्रवक्ता म्हणाले, "घातपाताचा प्रयत्न"

आज 10 मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील खासदार सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारला एक आलिशान कार जोरात येऊन धडकली.

Car Accident: दादांनंतर आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीच्या जीवाला धोका? गाडीला जोरदार धडक; प्रवक्ता म्हणाले, &quotघातपाताचा प्रयत्न&quot

आज 10 मे रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील खासदार सुप्रिया सुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या कारला एक आलिशान कार जोरात येऊन धडकली. सुप्रिया सुळे यांच्या गाडीला धडक देणारी गाडी ही गुजरात मधील होती याची सविस्तर माहिती स्वतः सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांचे विमान अपघातात निधन झाले. यानंतर त्यांच्या अपघाताला घातपाताचे वळण देण्यात येत होते. तसे अनेक आरोप राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या अपघातानंतर असाच एक तर्क लावण्यात आला आहे. या अपघातानंतर काही राजकीय नेत्यांनी, विशेषतः शरद पवार गटाच्या प्रवक्त्यांनी, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा संदर्भ देत हा घातपाताचा प्रयत्न असू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

हेही वाचा- Drugs Cases In India: देश अमली पदार्थांच्या विळख्यात! अव्वल स्थानी असणारा पंजाब मागे, ‘या’ राज्याची आकडेवारी अधिक, अहवालातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

राष्ट्रवादी प्रवक्त्याने दिली माहिती
यानंतर राष्ट्रवादी प्रवक्ते सुनिल माने यांनी शंका व्यक्त करत म्हटले की, “अजित पवार यांचा घातपात करण्यात आला त्याच पद्धतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला गुजरात मधल्या एका गाडीने अतिशय भयानकपणे टक्कर दिली. सुप्रिया सुळे देशाच्या नेत्या आहेत. अजित दादा नंतर सुप्रिया सुळे महत्त्वाच्या नेत्या आहेत. सुप्रिया सुळेंना अपघातात बरं वाईट करण्याचा हा प्रयत्न नव्हता ना अशी आमच्या मनात शंका आहे. राज्य सरकारने कसून चौकशी करावी…”

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकत माहिती दिली की, “नमस्कार, पुण्याहून मुंबईला गाडी चालवत असताना, एक गाडी आली आणि माझ्या गाडीला धडकली….. कृपया सर्व प्रवाशांनी काळजी घ्या, सीट बेल्ट लावा. तुम्ही गाडी कशी चालवता हा प्रश्न नाही, तो एक बेदरकार ड्रायव्हर असू शकतो. सुदैवाने मी सीट बेल्ट लावला होता. आम्ही सर्वजण पूर्णपणे सुरक्षित होतो… पण जेव्हा गाडी बाजूने येऊन माझ्या गाडीला धडकली तेव्हा क्षणभर थोडी भीती वाटली…. रस्ते सुरक्षा खूप महत्त्वाची आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number