मुंबई : विलास घुले मृत्यूप्रकरणी मुंबई सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार बजरंग सोनवणे यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. या प्रकरणी सोनवणे यांचा मुलगा सौरभ यांचे नाव समोर येत असून यावर खासदार यांनी स्पष्ट केले की, माझा मुलगा दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. विलास घुले यांचा मृत्यू झाला ही बाबा अतिशय दुर्दैवी आहे. बिड जिल्ह्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. हत्येनंतर मी माझ्या शोधल मीडियावर पोस्ट देखील केली होती. आता ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी करावं. मला पोलिसांनी ब्रीफ केले तेव्हा त्यांनी मला माझ्या मुलाचं नाव सांगितलं नाही. माझ्यावर आंदोलन करा म्हणून आंदोलन झाली, आंदोलन करणारे कोण आहेत? माझं आणि माझ्या मुलाचे नाव या प्रकरणात नव्हतं, सोमवारपासून आमच्या नावाची चर्चा केली जात आहे. या प्रकरणची चौकशी करा आणि माझा मुलगा दोषी आढळला, तर कारवाई करा. उगाच माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करू करा. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. खरच माझा मुलगा या प्रकरणात असेल तर कठोर कारवाई करा. तो कुठेच पळून गेला नाही घरीच आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील केज येथील विकास घुले हत्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप करत पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकास घुले हत्या प्रकरणात बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव समोर येत असतानाही त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, असा थेट सवाल नवनाथ वाघमारे यांनी केला आहे. याचबरोबर, हे संपूर्ण प्रकरण दडपून स्वतःच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न बजरंग सोनवणे करत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला आहे. संबंधित व्यक्तीच्या मोबाईलचा सीडीआर तपासून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाघमारे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींना पळून जाण्यास मदत करण्यात वापरण्यात आलेल्या वाहनाचा संबंधही बजरंग सोनवणे यांच्या मुलाशी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विकास घुले यांना न्याय मिळाला नाही तर येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे. या सर्व आरोपांमुळे आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलीस प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.