मुंबई : मुंबईतील मोनोरेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून स्थगित करण्यात आली आहे. नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत CBTC सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण, तसेच सुरक्षित, सुरळीत आणि अधिक विश्वासार्ह ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी मोनोरेल सेवा स्थगित करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएनं दिली आहे.
या तात्पुरत्या स्थगितीमुळे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) दरम्यानच्या संपूर्ण 19.74 किलोमीटरच्या मार्गावरील सेवांवर परिणाम होईल. एमएमआरडीएच्या मते मोठ्या प्रमाणात अखंडित चाचणी, प्रगत सिग्नलिंग सिस्टमची स्थापना आणि जुन्या गाड्यांचे संपूर्ण दुरुस्तीसाठी हे पाऊल आवश्यक आहे. “या नियोजित ब्लॉकमुळे नवीन रोलिंग स्टॉकचे जलद एकत्रीकरण, प्रगत CBTC सिग्नलिंग अपग्रेड आणि विद्यमान ताफ्याचे नूतनीकरण शक्य होईल. ज्यामुळे मुंबईकरांसाठी सुरक्षित, सुरळीत आणि अधिक विश्वासार्ह ऑपरेशन्स सुनिश्चित होतील,” असे प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे. सध्या, देखभाल आणि अपग्रेडचे काम रात्रीच्या 3.5 तासांच्या मर्यादित वेळेपुरते मर्यादित आहे. प्राधिकरणाने स्पष्ट केले की, हा कालावधी व्यापक प्रणाली तपासणी आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या स्थापनेसाठी अपुरा आहे.
Monorail services in Mumbai to be suspended from 20th September 2025 as a step towards faster integration of new Rolling Stock, advanced CBTC signalling upgrades, and refurbishment of the existing fleet – ensuring safer, smoother, and more reliable operations: MMRDA — ANI (@ANI) September 17, 2025