‘मोदींचा हात’ योगी आदित्यनाथ यांच्या ‘खांद्यावर’

  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कवितेसह हे फोटो ट्विट केले आहेत.   मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये […]

‘मोदींचा हात’ योगी आदित्यनाथ यांच्या ‘खांद्यावर’

  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका पुढील वर्षी होणार आहेत. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कवितेसह हे फोटो ट्विट केले आहेत.

  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून चर्चा करताना दिसत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी हे फोटो ट्विट करत एका कवितेद्वारे आपले मत मांडले आहे. त्यांनी लिहिले की, ‘हम निकल पड़े हैं प्रण करके अपना तन-मन अर्पण करके जिद है एक सूर्य उगाना है अम्बर से ऊँचा जाना है एक भारत नया बनाना है’.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीदरम्यानचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले असून त्यांच्यात चर्चा होत असल्याचे दिसत आहे.


Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number