PM Narendra Modi: ‘सत्ता समीकरण बदलताच काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला’; काँग्रेस-डीएमके वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यामुळे देशातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

PM Narendra Modi: ‘सत्ता समीकरण बदलताच काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला’; काँग्रेस-डीएमके वादावर पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली: देशातील विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये सत्तांतराचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिकाणी भाजपने सत्ता काबीज केली, तर काही राज्यांत काँग्रेसने ताकद वाढवली.

तामिळनाडूमध्ये मात्र यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. निवडणुकीत टीव्हीकेला 108 जागा मिळाल्या असून, डीएमकेला 59, एआयएडीएमकेला 47, काँग्रेसला 5, पीएमकेला 4, आययूएमएलला 2 आणि सीपीआयला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालांनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या निकालांनंतर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले की, काँग्रेसने डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. “25 ते 30 वर्षे डीएमकेसोबत राहून सत्ता उपभोगल्यानंतर आता काँग्रेसने त्यांच्याशी दगाबाजी केली,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेसने त्यांच्या मित्रपक्षालाच धोका दिल्याचेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर देशातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तामिळनाडूमधील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या आरोपांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा: IPL 2026 : चेन्नईच्या पठ्ठ्याने केली एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडणारी धडाकेबाज खेळी; 13 चेंडूंमध्ये रचला इतिहास

पंतप्रधानांनी काँग्रेसवर टीका करताना विरोधकांच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित केले. “सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची काँग्रेसची वृत्ती देश पाहत आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे आगामी काळात विरोधक आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या आरोपांवर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या या घणाघाती टीकेमुळे देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा: PM Modi On Energy Crisis: ‘ पुढील 4 वर्षे सोनं खरेदी करू नका, पेट्रोल-डिझेल…’; मध्य-पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा मोठा इशारा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number