राज्यातील ६ रुग्णालयांत ‘मोबाइल सीटी स्कॅन’

मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याचे निदान करण्यासाठी 'सीटी स्कॅन' ही वैद्यकीय चाचणी केली जाते.

राज्यातील ६ रुग्णालयांत ‘मोबाइल सीटी स्कॅन’

मुंबई : मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याचे निदान करण्यासाठी ‘सीटी स्कॅन’ ही वैद्यकीय चाचणी केली जाते. अनेकवेळा रुग्णाची शस्त्रक्रिया करावी लागते. त्यावेळी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सीटी स्कॅनची गरज भासते. सीटी स्कॅन तळमजल्यावर असते. त्या ठिकणी रुग्णाला प्रत्येकवेळी नेणे त्रासदायक असते. हा त्रास वाचविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयात सहा मोबाइल सीटी स्कॅन मशीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे मशीन अतिदक्षता विभागात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये ठेवण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने मोबाइल सीटी स्कॅन मशीनसाठी ८४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. अनेक खासगी मोठ्या रुग्णालयांत मोबाइल सीटी स्कॅनची व्यवस्था असते. तशीच व्यवस्था आता सरकारी रूग्णालयात केली जाणार आहे. 

 

 

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number