रत्नागिरी, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्च करूनही अपूर्ण राहिलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आता मनसे आक्रमक झाली असून या मार्गाचं काम वेगाने पूर्ण करावं, यासाठी मनसेच्या जागर यात्रेला सुरवात झाली आहे. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झालेली आहे. मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून ही पदयात्रा असून या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये होणार आहे. त्यानंतर कोलाडमध्ये जागर यात्रेच्या संगमस्थळी राज ठाकरे भाषण करणार आहेत.
दरम्यान, मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही जागर यात्रा निघाली आहे. तर मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. ही पदयात्रा तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात चालत ही पदयात्रा करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात मनससेकडून गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे.
मनसे नेत्यांच्या नेतृत्वात रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील ८ वेगवेगळ्या मार्गांवरून पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेचा समारोप कोलड येथे राज ठाकरेंच्या भाषणाने होणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा हा पळस्पे ते माणगाव निघणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर या यात्रेचा दुसरा टप्पा हा भरणी नाका ते राजापूर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यात राजापूर ते बांदापर्यंत गाव जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
अमित ठाकरे – पळस्पे फाटा ते खारपाडा
बाळा नांदगावकर – तरणखोप ते कासू
संदीप देशपांडे – निवळी ते वांद्री
राजू पाटील – नागोठणे ते खांब