Ratnagiri Passenger Train: कोकणवासीयांसाठी मनसे आक्रमक! ‘दादर-रत्नागिरी ट्रेन सुरू करा, नाहीतर…’; मनसेचा कडक इशारा

दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी मनसे आक्रमक झाली असून १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Ratnagiri Passenger Train: कोकणवासीयांसाठी मनसे आक्रमक! ‘दादर-रत्नागिरी ट्रेन सुरू करा, नाहीतर…’; मनसेचा कडक इशारा

Ratnagiri Passenger Train: मुंबई ते कोकण प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोरोनानंतर या गाडीचा मार्ग बदलण्यात आला असून सध्या ती केवळ दिवा स्थानकापर्यंतच धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत आहे.

मनसेच्या नेतृत्वाने या मुद्द्यावर आता थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. पूर्वीप्रमाणे ही गाडी दादरपर्यंत सुरू करावी, अशी मागणी करत पुढील १५ ते २० दिवसांत निर्णय न झाल्यास कठोर पावले उचलली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोकणात जाणाऱ्या सामान्य प्रवाशांसाठी ही ट्रेन अत्यंत आवश्यक आहे. सध्या दिव्यापर्यंत जाऊन गाडी पकडावी लागत असल्याने प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत आहे. ही गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा: LPG वापरकर्त्यांसाठी मोठा धक्का! सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले; आता इतक्या दिवसांनीच मिळणार सिलिंडर

याच मुद्द्यावर मनसेचे नितीन सरदेसाई यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अनेक वेळा पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कोकणातील लोकांनी रेल्वे प्रकल्पांसाठी जमीन दिली, मात्र त्याच लोकांना आज प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

रेल्वे प्रशासनाच्या मते, दादरपर्यंत पॅसेंजर ट्रेन सुरू केल्यास लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. मात्र, हा मुद्दा ग्राह्य धरता येणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग शोधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: पगारदारांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिलपासून ‘फॉर्म 16’ बंद आता आयकर भरण्यासाठी ‘हा’ नवा फॉर्म ठरणार महत्त्वाचा

मनसेने इशारा दिला आहे की, जर ही मागणी मान्य झाली नाही, तर उत्तर भारतात जाणाऱ्या काही गाड्या रोखण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात तणाव वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोकणात जाण्यासाठी रेल्वे हा सर्वात सोयीचा आणि परवडणारा पर्याय मानला जातो. रस्त्यांची अवस्था आणि वाहतुकीची कोंडी यामुळे अनेक प्रवासी रेल्वेवर अवलंबून असतात. त्यामुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.

आता रेल्वे प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच सकारात्मक निर्णय झाला नाही, तर या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number